Maharashtra Ladki Bahin Yojana 2024
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024
‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आज पासून (सोमवार 1 जुलै 2024 पासून) अर्ज करता येणार असून त्याचे संकेतस्थळ लवकरच आपल्या SUNRISE MAHAJOBS या पोर्टलवर आम्ही लाभार्थींना लवकरच उपलब्ध करून दिले जाईल. प्राप्त अर्जांची पडताळणी अंगणवाडी पर्यवेक्षक, प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका करतील. ग्रामसेवक देखील अर्जांची पडताळणी करू शकतात. त्यांच्याकडील अर्ज आमच्याकडे आल्यावर यादी अंतिम करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करू. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती लाभार्थींची अंतिम यादी जाहीर करेल आणि त्यांना लाभ मिळेल.
अर्ज भरण्याची सुविधा – अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, ग्रामपंचायत व महापालिकेचे वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्र व महा- इ- सेवा केंद्रे येथे पात्र महिलांना योजनेचा अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक थोडयाच वेळात आम्ही अपडेट करु,
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अॅपद्वारे/सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाइन भरले जाऊ शकतात. हि लिंक थोड्याच वेळात आम्ही महाभरती वर अपडेट करू. पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज सादर करता येत नसेल, त्याच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, ग्रामपंचायत/ वॉर्ड/ सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील. भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात / बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, सेतू सुविधा केंद्रांमध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाइन प्रविष्ट केला जाईल. अर्ज भरण्याची प्रक्रिया विनामूल्य राहील, असे आदेशात शासन निर्णयात नमूद आहे. SunriseMahaJobs
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणयोजनेचा पूर्ण शासन निर्णय (GR) येथे पहा
Maharashtra Ladki Bahin Yojana 2024
अर्ज भरण्याची प्रक्रिया – Ladki Bahini Yojana Schedule
– अर्ज करण्याची सुरुवात : १ जुलै २०२४
– अर्ज करण्याची शेवट तारीख : १५ जुलै २०२४
– प्रारूप निवड यादी प्रकाशित : १६ ते २० जुलै २०२४
– प्रारूप यादीवर हरकत, तक्रार करणे : २१ ते ३० जुलै २०२४
– लाभार्थी अंतिम निवड यादी प्रकाशित : १ ऑगस्ट २०२४
– लाभ देण्यास सुरुवात : 14 ऑगस्ट २०२४ पासून
Ladki Bahini Yojana Eligibility Criteria
कोणत्या महिला असणार पात्र?
– महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक
– वयाची किमान २१ वर्ष पूर्ण व कमाल ६० वर्ष मर्यादा
– अर्ज करणाऱ्या महिलांचे बँक खाते असणे आवश्यक
– अर्जदार महिलेच्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजारांपेक्षा जास्त नसावे
– अन्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजार रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतला नसेल
– ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन नावावर नसेल, अशा महिला
- माझी लाडकी बहीण योजना आवशक्यक कागदपत्रे – MaziI Ladki Bahin Yojana Required Documents (List of Documents)
– ऑनलाइन संकेतस्थळावर अथवा प्रत्यक्ष अर्ज करावा
– आधार कार्ड आवश्यक
– राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अथवा राज्यातील जन्म दाखला
– बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
– पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड
– योजनेच्या अटी-शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
– अर्ज दाखल करताना अर्जदार महिला प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक
Maharashtra Ladki Bahin Yojana 2024
Maharashtra Ladki Bahin Yojana 2024
प्रत्येक नवीन जाहिराती आणि त्याबद्दल नवीन अपडेट्स साठी SunriseMahaJobs पोर्टल ला नक्की भेट द्या.